लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना; अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी QR कोडचा पास

मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असली तरीदेखील मुंबई सध्या लेव्हल-३ मध्ये असून तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध लागू असतील. रुग्णसंख्या पुन्हा वाढू नये यासाठी मुंबई महानगरपालिका सावध पावले उचलत आहेत. मुंबई लोकलबाबतही महापालिकेने आस्ते कदम पुढे जाण्याचे धोरण कायम ठेवले आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबईची लाईफलाईन लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे, मात्र तरीही बनावट ओळखपत्राचा वापर करून अवैध मार्गाने लोकल प्रवास सुरू आहे. यावर चाप बसावा आणि लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड असलेला पास देण्याचा निर्णय घेतला आहे. युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास असे या सिस्टिमचे नाव असून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच क्युआर कोडचा पास दिला जाणार आहे.

    मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असली तरीदेखील मुंबई सध्या लेव्हल-३ मध्ये असून तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध लागू असतील. रुग्णसंख्या पुन्हा वाढू नये यासाठी मुंबई महानगरपालिका सावध पावले उचलत आहेत. मुंबई लोकलबाबतही महापालिकेने आस्ते कदम पुढे जाण्याचे धोरण कायम ठेवले आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

    क्यूआर कोड असलेले युनिवर्सल आयकार्ड अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. कर्मचाऱ्यांकडे हे ओळखपत्र असेल तरच त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश मिळणार आहे. तसेच, क्युआर कोड असलेले पास स्मार्टफोन किंवा क्युआर रिडर मशीनद्वारे तपासण्यात येणार आहेत. त्यामुळे ते पास बनावट आहेत का? हे ओळखण्यास मदत होणार आहे. क्यूआर कोड सिस्टिममुळे बोगस ओळखपत्रावरुन प्रवास करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

    अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड असलेला पास मिळाला की, रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरुन त्यांना पास व तिकीट मिळू शकते. याबाबतीत राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेच्या महासंचालकांना पत्र दिले आहे. मात्र, क्यूआर कोड सिस्टिम कधीपर्यंत लागू होईल, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.