sero survey

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने(आयसीएमआर)(ICMR)कोविड-१९ सिरो सर्व्हे ३ (sero survey 3) सुरू केला असून यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. या सर्व्हेनंतरच काेविड लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचे बाेलले जात आहे.

मुंबई : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने(आयसीएमआर)(ICMR)कोविड-१९ सिरो सर्व्हे ३ (sero survey 3) सुरू केला असून यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. या सर्व्हेनंतरच काेविड लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचे बाेलले जात आहे. यामुळे हा सर्व्हे जानेवारीच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय आयसीएमआरने घेतला आहे. मागील गुरुवारपासून या सर्व्हेला सुरुवात करण्यात आली आहे. या सर्व्हेच्या माध्यमातून ७० जिल्ह्यांतील २९ हजार नागरिक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. यापूर्वी करण्यात आआलेल्या सर्व्हेच्या ठिकाणीच हा तिसरा सर्व्हे केला जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात.

दुसऱ्या सिराे सर्व्हेमध्ये १० वर्षावरील मुलांच्या संसर्गाबाबत अभ्यास करण्यात आला हाेता. सिराे सर्व्हे ३ मध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांमधील संसर्गाचे प्रमाण किती आहे. याबाबत माहिती मिळू शकणार आहे. ज्यामुळे लसीकरणाची प्राथमिकता ठरविण्यासाठी आराेग्य विभागाला मदत मिळणार आहे.

याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीचे संचालक डॉ. मनोज मुर्हेकर यांनी सांगितले की, मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या परिसरातील संक्रमण आणि रोगप्रतिकारक शक्तीचे प्रमाण समजून घेण्याबाबतचे उद्दीष्ट आहे. तिसऱ्या सर्वेक्षणातील इत्यंभूत माहिती पुढील महिन्यात मिळू शकेल, असे डाॅ. मुर्हेकर म्हणाले.