uddhav thackeray and sharad pawar

मुख्यमंत्री रविवारी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या बैठकीसाठी दिल्लीला(Chief Minister Visit To Delhi) जात असून, नक्षलवादाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपुर्वी मुख्यमंत्र्याना भेटून पवार यानी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात(Meeting At Sahyadri Guest House) तासाभरापेक्षा जास्त काळ चर्चा केली आहे.

  मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Uddhav Thackeray And Sharad Pawar Meeting) यांच्यात मुंबईत महत्वाची बैठक झाली आहे. मुख्यमंत्री रविवारी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या बैठकीसाठी दिल्लीला(Chief Minister Visit To Delhi) जात असून, नक्षलवादाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपुर्वी मुख्यमंत्र्याना भेटून पवार यानी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात(Meeting At Sahyadri Guest House) तासाभरापेक्षा जास्त काळ चर्चा केली आहे.

  भिमा कोरोगावच्या घटनेचा संदर्भ
  यावेळी सह्याद्री अतिथीगृहात डिजीटल शिक्षणाबाबत बैठकीसाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, वर्षा गायकवाड आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात एक महत्वाची बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरी नक्षलवाद्यांच्या मुद्द्याला भिमा कोरोगावच्या घटनेचा संदर्भ असून या घटनेची सीबीआय कडून चौकशी करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात मतभेद राहिले आहेत.

  राज्य सरकारही स्वतंत्रपणे चौकशी करत आहे. त्या संदर्भात पवार यांचे मुख्यमंत्र्याना मार्गदर्शन महत्वाचे मानले जात आहे. या प्रकरणात फडणवीस सरकारच्या काळात पुरोगामी लेखक विचारवंतांना शहरी नक्षलवादाच्या मुद्यावर अटक करण्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतभेद आहेत. त्याबाबत राज्य सरकारही स्वतंत्रपणे चौकशी करत आहे, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  नक्षलवाद आणि माओवादा विरोधात केंद्राची कठोर भुमिका
  नक्षलवाद आणि माओवादाविरोधात केंद्र सरकार कठोर भुमिका घेत असून, त्याबाबत नवी योजना आखण्याच्या तयारी करत आहे. यासाठी देशातील नक्षल आणि माओग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.