सरकारच्या नियमांनुसारच बैठका घेतल्या जातील : महापौर

महापालिकेतील सर्व सभा प्रत्यक्ष घ्या व लसीचे दोन डोस घेतलेल्या पत्रकारांना सभेत प्रवेश द्या या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी कोविडचे सर्व नियम पाळत महापौर दालनाबाहेर जोरदार निर्दशने केली. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर कमी झाला आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे. राज्य शासनाने जास्त गर्दी होत असलेल्या मोहरमच्या मिरवणुकीस देखील परवानगी दिलेली होती.

    मुंबई – मुंबई महापालिकेच्या सभा ऑनलाईन न घेता प्रत्यक्ष घ्याव्यात तसेच बैठकांमध्ये घेतलेला निर्णय मुंबईकरांना कळावा यासाठी पत्रकारांना प्रवेश द्यावा या मागणीसाठी भाजपकडून महापौर कार्यालयाबाहेर निदशर्ने करण्यात आली. त्यावर प्रत्यक्ष सभा घेण्याबाबत सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सरकारच्या नियमानुसार बैठक घेतल्या जातील असे महापौरांनी सांगितले. तर भाजपाला फक्त राजकारण करायचे असून त्यांना खरेच प्रत्यक्ष सभा हव्या असल्यास त्यांनी पालिका आयुक्तांकडे आंदोलन करायला पाहिजे असा टोला सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी लगावला आहे.

    महापालिकेतील सर्व सभा प्रत्यक्ष घ्या व लसीचे दोन डोस घेतलेल्या पत्रकारांना सभेत प्रवेश द्या या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी कोविडचे सर्व नियम पाळत महापौर दालनाबाहेर जोरदार निर्दशने केली. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर कमी झाला आहे.

    दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे. राज्य शासनाने जास्त गर्दी होत असलेल्या मोहरमच्या मिरवणुकीस देखील परवानगी दिलेली होती. भारताचे सर्वोच्च सभागृह असलेली लोकसभा प्रत्यक्ष स्वरुपात होते. मात्र महापालिकेच्या वैधानिक समिती सभा व विशेष सभा अद्यापही प्रत्यक्ष न घेता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

    व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभेत कोण सदस्य काय बोलला हे नीट ऐकू येत नाही तसेच प्रतिध्वनी ऐकू येतो. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील समस्या मांडता येत नाहीत. त्यामुळे सदर सर्व बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऐवजी प्रत्यक्ष घेणे आवश्यक आहे असल्याची मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. त्याचा शिवसेनेने चांगलाच समाचार घेतला महापौरांनी सरकारच्या नियमांनुसार बैठका घेतल्या जातील असे सांगितले. तर सभागृह नेत्या विशाखा राउत यांनी देखील भाजपावर टिका करून त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली.