रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज Mega Block; वेळापत्रक पाहूनच दिवाळी खरेदासाठी घराबाहेर पडा

सकाळी १०.१८ ते दुपारी ३.३६ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून (CSMT, Mumbai) सुटणाऱ्या धीम्या (Slow Line) मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान (Matunga and Mulund) जलद (Fast Line) मार्गावर वळवण्यात येतील आणि विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे त्या मुलुंड येथे निश्चित केलेल्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

    मुंबई : मध्य रेल्वेतर्फे (Central and Western Railway) मुंबई विभागात (Mumbai Division) दोन्ही मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी (Repairs and Maintainance Work) त्यांच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक (Jumbo Block) घेण्यात येईल.

    माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत

    सकाळी १०.१८ ते दुपारी ३.३६ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून (CSMT, Mumbai) सुटणाऱ्या धीम्या (Slow Line) मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान (Matunga and Mulund) जलद (Fast Line) मार्गावर वळवण्यात येतील आणि विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे त्या मुलुंड येथे निश्चित केलेल्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

    ठाण्याहून (Thane) सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकावर थांबणार नाहीत. यापुढे माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येईल.

    हार्बर मार्ग

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून (Wadala Road) वाशी/बेलापूर/पनवेलसाठी (Vashi/ Belapur/Panvel) सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत आणि वांद्रे/गोरेगाव (Bandra/ Goregaon) येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन हार्बर (Down Harbour Line) मार्गावरील सेवा बंद राहतील.

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ या वेळेत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

    तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

    हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची परवानगी आहे.

    पश्चिम मार्ग

    बोरिवली – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर (१०:३५ तास – १५:३५ वाजेपर्यंत)

    बोरिवली आणि गोरेगाव (Borivali and Goregaon) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर आज सकाळी १०.३५ ते १५.३५ वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक (Jumbo Block) घेण्यात येईल.

    ब्लॉक कालावधीत, सर्व अप आणि डाऊन जलद गाड्या बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर चालवल्या जातील आणि काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील.