मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच प्रवासाचा मार्ग निश्चित करा

ब्लॉकच्या कालावधीत, वाशी / नेरूळ/ पनवेलसाठी डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे येथून सकाळी १०.३५ ते संध्याकाळी ४.१९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या आणि पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी १०.१२ संध्याकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  मुंबई : देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेतर्फे उपनगरी भागांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइन मार्गावर आज कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याने आज या मार्गावरील प्रवाशांना दिलासा दिला आहे.

  ट्रान्स हार्बर मार्ग Trans Harbour line

  ठाणे – वाशी / नेरुळ अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत

  ब्लॉकच्या कालावधीत, वाशी / नेरूळ/ पनवेलसाठी डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे येथून सकाळी १०.३५ ते संध्याकाळी ४.१९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या आणि पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी १०.१२ संध्याकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  हार्बर मार्ग Harbour line

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान आणि चुनाभट्टी /वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान

  डाऊन हार्बर मार्गावर वाशी / बेलापूर / पनवेलकरीता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई / वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते संध्याकाळी ४.४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५६ ते संध्याकाळी ४.४३ दरम्यान वांद्रे / गोरेगाव दरम्यान डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

  अप हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करिता पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या आणि
  अप हार्बर मार्गावर गोरेगाव /वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.५८ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणा-या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

  ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे जाण्याची परवानगी आहे.

  पश्चिम रेल्वे मार्ग Western Line Marg

  आज पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉग घेण्यात येणार नाही.

  Mega block today on Harbour and Trans harbour routes to Central Railway Main Line and Western Railway Only then can you determine the route of your trip