पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवर आज Mega Block; मेन लाइनवर दिवा-ठाणे दरम्यान १० तासांचा विशेष ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) - चुनाभट्टी / वांद्रे (Chunabhatti/ Bandra) डाऊन हार्बर मार्गावर (Down Harbour Line) सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत.

    मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या (Western And Central Railway) मुंबई विभागात (Mumbai Division) हार्बर लाईनवर (Harbour Line) देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी (maintainance work) आज मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. तर मेन लाईनवर दिवा-ठाणे दरम्यान १० तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आले आहे (Special 10 hour block between Diva-Thane on Main Line).

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) - चुनाभट्टी / वांद्रे (Chunabhatti/ Bandra) डाऊन हार्बर मार्गावर (Down Harbour Line) सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे/गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

    पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

    तथापि, ब्लॉक कालावधी दरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

    हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    मेन लाईन वर दिवा आणि ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावर ५व्या आणि ६व्या मार्गासाठी १० तासांचा विशेष ब्लॉक आधीच जाहीर करण्यात आलेला आहे.

    पश्चिम मार्ग

    सांताक्रुझ – गोरेगाव (Santacruz And Goregaon) अप आणि डाऊन स्लो मार्गावर (सकाळी १०.३५ ते दुपारी ०३. ३५ पर्यंत)

    पश्‍चिम रेल्वेतर्फे सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान आज सकाळी १०.३५ ते दुपारी ०३. ३५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक (Jumbo Block) घेण्यात येईल.

    ब्लॉक कालावधी दरम्यान, सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील. सर्व धीम्या उपनगरीय सेवा जलद मार्गावरील विलेपार्ले स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ५/६ वर दोनदा थांबतील आणि दोन्ही दिशेने राम मंदिर स्टेशनवर थांबणार नाहीत. काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील.