Megablock

दादर (Dadar) येथून सकाळी १०.११ ते दुपारी ३.१४ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर न थांबता दिवा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

  मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) मुंबई विभागात (Mumbai Division) आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी (Repair and Maintenance आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक (MegaBlock) आयोजित केला असून पश्चिम रेल्वेवर (Western Railway) चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान (Churchgate to Mumbai Central) जम्बोब्लॉक (JumboBlock) घेण्यात येणार आहे.

  मध्य रेल्वे मेन लाईन

  मुलुंड-दिवा अप आणि दिवा धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत

  दादर (Dadar) येथून सकाळी १०.११ ते दुपारी ३.१४ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर न थांबता दिवा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

  कल्याण (Kalyan) येथून सकाळी १०.२७ ते दुपारी ३.३७ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरील थांब्यांवर न थांबता पुढे मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

  मध्य रेल्वे हार्बर लाईन

  पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत (बेलापूर-खारकोपर सेवा प्रभावित नाही; नेरुळ-खारकोपर सेवा रद्द)

  पनवेल (Panvel) येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरिता (CSMT, Mumbai) सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१६ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकरिता सुटणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकरिता जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  नेरूळ येथून सकाळी ११.४० ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत खारकोपरसाठी सुटणारी डाउन मार्गावरील सेवा आणि खारकोपर येथून सकाळी १२.२५ ते सायंकाळी ४.२५ वाजेपर्यंत नेरूळकरीता सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.

  ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील.

  ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

  पश्चिम रेल्वे

  चर्चगेट-मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन फास्ट लाईन्स (१०.३५ ते दुपारी ०३.३५ पर्यंत)

  चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल (Churchgate to Mumbai Central) लोकल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर आज सकाळी १०:३५ ते ०३:३५ या वेळेत पाच तासांचा जम्बो ब्लॉक (JumboBlock) घेण्यात येईल. ब्लॉक कालावधी दरम्यान, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील उपनगरीय गाड्या धीम्या मार्गांवर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे.