महाराष्ट्रात आजपासून सदस्य नोंदणीला सुरूवात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल

मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेनं सदस्यत्व नोंदणीच्या कार्यक्रमास आजपासून (रविवार) सुरूवात केली आहे. या कार्यक्रमास मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, संदीप देशपांडे आणि अनेक नेते मंडळींनी उपस्थिती लावली होती.

    मुंबई : महाराष्ट्रात आजपासून सदस्य नोंदणीला सुरूवात होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेनं सदस्यत्व नोंदणीच्या कार्यक्रमास आजपासून (रविवार) सुरूवात केली आहे. या कार्यक्रमास मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, संदीप देशपांडे आणि अनेक नेते मंडळींनी उपस्थिती लावली होती.

    मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने १४ मार्चला सदस्य नोंदणीला सुरूवात होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आज १४ मार्चला मनसेच्या सदस्यत्व नोंदणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान, ही नोंदणी २४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन सदस्यत्व नोंदणी करावी, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.