nilesh rane sanjay raut

'ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचं नुकसान केलं आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, नगर विकास, गृहनिर्माण, कायदा-सुव्यवस्था, महिलांवरचे अत्याचार ह्या सगळ्या विषयात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे तरीही राऊत निर्लज्जासारखा म्हणतात की सेनाभवन राजकीय भूकंपाचं केंद्र होणार,'' अशीही टीका निलेश राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे.

मुंबई : माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नेते येत जात असतात,नेते गेले म्हणून काय झाले कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. ते सेनेसाठी पाय घट्ट रोवून उभे राहणार आहेत. भविष्यातल्या घडामोडींचे केंद्र सेनाभवन असेल असे वक्तव्य संजय राऊत यांनी यावेळी केले होते. निलेश राणेंनी त्यांच्या या वक्तव्याचा आपल्या ट्वीटच्या माध्यमातून समाचार घेतला आहे.

”ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचं नुकसान केलं आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, नगर विकास, गृहनिर्माण, कायदा-सुव्यवस्था, महिलांवरचे अत्याचार ह्या सगळ्या विषयात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे तरीही राऊत निर्लज्जासारखा म्हणतात की सेनाभवन राजकीय भूकंपाचं केंद्र होणार,” अशीही टीका राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे.