प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

काळा घोडा येथील ऐतिहासिक एस्प्लानेड मेनश तसंच बाबुला टँक, मुंबादेवी, मस्जिद, व्ही.पी. रोड, सोनापूर, भोईवाडा आणि उमरखडीतील काही इतर इमारती अतिधोकादायक इमारती म्हणून म्हाडानं जाहीर केलं आहे.

    मुंबई : मुंबईतील २१ धोकादायक इमारतींची यादी म्हाडानं जाहीर केली आहे. ज्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत. तसंच या पावसाळ्यात त्या कोसळण्याची शक्यता आहे, अशा इमारतींचा यात समावेश आहे.वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन म्हाडानं ही माहिती दिली. मुंबई दुरुस्ती व पुर्नरचना मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी सांगितलं की, म्हाडानं मे आणि जून या महिन्याच्या दरम्यान इमारतींचं सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार त्यात २१ इमारती अतिधोकादायक असल्याचं निर्देशनास आलं.

    या इमारतींचा समावेश
    या यादीत काळा घोडा येथील ऐतिहासिक एस्प्लानेड मेनश तसंच बाबुला टँक, मुंबादेवी, मस्जिद, व्ही.पी. रोड, सोनापूर, भोईवाडा आणि उमरखडीतील काही इतर इमारती अतिधोकादायक इमारती म्हणून म्हाडानं जाहीर केलं आहे.

    लोकांचं स्थलांतर सुरु
    विनोद घोसाळकर म्हणाले, धोकादायक असलेल्या २१ इमारतींमध्ये १० अशा इमारती आहेत. ज्यांचा समावेश २०२० च्या यादीतही आहे. त्या इमारतींमध्ये ४६० रहिवासी होते. ज्यापैकी १९३ रहिवाशांनी स्वतःची व्यवस्था करुन घरं रिकामी केलीत. आम्ही २० लोकांचं स्थलांतर केले असून लवकरच २४७ जणांसाठी पुनर्वसन योजना आखत आहोत.पुढे घोसाळकर यांनी सांगितलं की, म्हाडाची ताडदेव येथे २४ तास कार्यरत हेल्पलाईन कार्यरत असून ही हेल्पलाईन आपत्ती व्यवस्थापनाचं काम करते. तसंच म्हाडा पावसाळ्यात कार्यशील आणि सक्रिय, असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.