मिलींद नार्वेकरांकडे नवी जबाबदारी, टी-२० मुंबई लीग गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमनपद

मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आता टी-२० स्पर्धांबाबतच्या आयोजनाची सर्व सूत्रं असणार आहेत. केवळ नियोजनच नव्हे, तर या स्पर्धेशी संबंधित सर्व जबाबदारी नार्वेकरांकडे असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीत नार्वेकरांसोबत सूरज सामंत, जगदीश आचरेकर, संजय नाईक यांच्यासह आणखी दोन सदस्य असणार आहेत.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना आता एक नवी जबाबदारी मिळालीय. टी-२० मुंबई लीग गव्हर्निंग काऊन्सिलच्या चेअरमनपदी त्यांची बिनविरोध निवड झालीय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रविवारी पार पडलेल्या बैठकीत नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर सूरज सामंत यांचीदेखील या समितीचे सदस्य म्हणून निवड झाली.

मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आता टी-२० स्पर्धांबाबतच्या आयोजनाची सर्व सूत्रं असणार आहेत. केवळ नियोजनच नव्हे, तर या स्पर्धेशी संबंधित सर्व जबाबदारी नार्वेकरांकडे असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीत नार्वेकरांसोबत सूरज सामंत, जगदीश आचरेकर, संजय नाईक यांच्यासह आणखी दोन सदस्य असणार आहेत.

नव्वदच्या दशकात शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी एमसीएचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्या रुपानं शिवसेनेच्या नेत्याकडे एमसीएतील मोठ्या पदाची जबाबदारी आलीय. ही जबाबदारी आपण अत्यंत प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेने पार पाडू, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केलाय.

२०१८ साली मुंबई टी-२० लिगला सुरुवात झाली. गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ सालीदेखील ही स्पर्धा पार पडली होती. यंदा मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर पुढील वर्षी ही स्पर्धा होईल, असा अंदाज आहे. या स्पर्धेमुळे मुंबईतील गुणवत्ता पुढं येण्यास मदत होत असल्याचं सांगितलं जातं.