दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करुन शेतकऱ्यांना दिलासा देणार : सुनील केदार

दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी संघटना, विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्यानंतर दूध दरासंबंधी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.

  मुंबई : दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी संघटना, विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्यानंतर दूध दरासंबंधी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.

  एफआरपीप्रमाणेच भाव मिळावा यासाठी कायदा

  कोरोना आणि निर्बंधाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुधाचे दर कमी झाल्याने संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी संघटनानी आंदोलन केले होते.  ते म्हणाले की, दुधाच्या दराच्या संदर्भात आज वेगवेगळ्या प्रतिनिधींशी चर्चा केली. ऊसाप्रमाणे दुधाला एफआरपीप्रमाणेच भाव मिळावा यासाठी कायदा करण्याच ठरले आहे. त्यासंदर्भात लवकरच कायदा केला जाईल. जेणेकरून दूध उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसू शकणार नाही.

  ऊसाप्रमाणे दुधासाठी किमान आधारभूत दर

  ऊसाप्रमाणे दुधासाठी किमान आधारभूत दर मिळावा अशा पद्धतीची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. २५ रुपये लिटर दूध अशी मागणी असली तरी सुद्धा दुधाच्या किमती बाबत वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असेही सुनील केदार म्हणाले. निर्बंधामुळे अनेक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. त्यादृष्टीने दिलासा द्यायचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

  आज समाधानकारक चर्चा झाल्या

  दूध दरवाढ मिळावी म्हणून रयत क्रांती संघटनेने १० जून रोजी मंत्रालय परिसरात आंदोलन केले होते. आजच्या वैठकीलातर किसान महासभेचे डॉ अजित नवले, भाजपचे डॉ अमिल बोंडे शेतकरी नेते संतोष सूर्य़वंशी सदाभाऊ खोत आदी नेते   उपस्थित होते. यावेळी बोलताना  डॉ नवले यानी तातडीने दुधाला वाढीव भाव देण्याबाबतच्या आश्वासनानुसार किमान ३५ रूपयापेक्षा जास्त भाव द्यावा अशी मागणी केली ते म्हणालेकी आज समाधानकारक चर्चा झाल्याने आम्हाला आता सरकारच्या कृतीची प्रतिक्षा आहे. ते म्हणाले की ज्याप्रमाणे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये ऊसासाठी किमान आधारभूत किंमत FRP आहे. त्याच धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी. महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना समान भाव देणे गरजेचे आहे. दुधाला भाव नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक दूध उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. किमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दराप्रमाणे दूध उत्पादकांना भाव मिळणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली