
राज्यातील एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी काल काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेला आघाडीत सहभागी करून घ्या असा प्रस्ताव दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तो फेटाळला आहे. मात्र याच मुद्यावर मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे वक्तव्य करत जलिल यांनी आणखी एकदा राळ उडवून दिली आहे(MIM's struggle to go for Mahavikas Aghadi! MP Imtiaz Jalil will meet Chief Minister Uddhav Thackeray along with Sharad Pawar).
मुंबई : राज्यातील एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी काल काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेला आघाडीत सहभागी करून घ्या असा प्रस्ताव दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तो फेटाळला आहे. मात्र याच मुद्यावर मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे वक्तव्य करत जलिल यांनी आणखी एकदा राळ उडवून दिली आहे(MIM’s struggle to go for Mahavikas Aghadi! MP Imtiaz Jalil will meet Chief Minister Uddhav Thackeray along with Sharad Pawar).
धर्मनिरपेक्ष असल्याचे प्रमाणपत्र कुठून आणू
महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबतचा प्रस्ताव एमआयएमने दिल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत एमआयएमशी युती होवू शकत नसल्याचे स्पष्ट केले.तरीही आज इम्तियाझ जलिल यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबतचा प्रस्ताव शिवसेनेला देत. याप्रश्नी आपण लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
तसेच आम्ही धर्मनिरपेक्ष विचाराचा पक्ष असलेली माणसे असून भाजपाच्या पराभवासाठी आम्ही युती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण ते लोक म्हणतात आम्ही धर्मनिरपेक्ष नाही म्हणून मला कळेना आता मी त्यांना आम्ही धर्मनिरपेक्ष असल्याचे प्रमाणपत्र कुठून आणून दाखवू. ते कुठे मिळते का? असा उपरोधिक सवालही त्यांनी यावेळी केला.
शरद पवार यांची भेट घेणार
जलील यांनी युती करण्याबाबतचा प्रस्ताव काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचेही जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून संयमी भूमिका मांडत एमआयएमच्या भूमिकेची तपासणी आणि त्यांनी पाठविलेल्या युतीचा प्रस्ताव समजून घेतल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेवू असे सांगत युती करणार की नाही याबाबत स्पष्ट बोलण्याचे टाळले.