‘सांभाळून बोला, हमाम मे सब नंगे है’ मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा क्रांती रेडकरला सल्ला

NCB चे अधिकारी समीर वानखडे यांच्या पत्नी व मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी माझ्या महाराष्ट्रात मला धमकी दिली जात आहे, जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्याला मंत्री आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.

    अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर त्यांचा इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम में सब नंगे है। असा टोला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत्री क्रांती रेडकरला लगावला. काल ठाण्यात उल्हासनगर पालिकेच्या 22 नगसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.

    काय म्हणाले मंत्री जितेंद्र आव्हाड?

    समीर वानखडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी माझ्या महाराष्ट्रात मला धमकी दिली जात आहे, जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवं असा सल्ला दिला आहे. तसंच ;आम्ही जर का मागचा इतिहास काढला तर महागात पडेल आणि लक्षात येईल की हमाम मे सब नंगे है’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. पत्नी म्हणून ती तिचं कर्तव्य पार पाडत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

    पुढे बोलताना मंत्री आव्हाड म्हणाले की, समीर वानखेडे यांनी 4 हजार प्रवाशी असलेल्या क्रूझवर धाड टाकली त्यावेळी त्यांना केवळ 6 जण ड्रग्ज घेतलेले मिळाले. बाकी 3 हजार 994 जण व्यवस्थित होते. असं कसं हा प्रश्न मला पडला आहे. जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्या सर्टिफिकेट बाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की राज्यात 90 हजार बोगस सर्टिफिकेटवर नोकरीला लागले आहेत. याचा अर्थ त्यांनी समीर वानखेडे यांचं सर्टिफिकेट बोगस आहे हे मान्य केलं आहे. जर ते मान्य करत आहेत तर त्यावरून भाजपची भुमीका स्पष्ट होत आहे. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो असं देखील आव्हाड म्हणाले.

    दरम्यान, NCB चे अधिकारी समीर वानखडे यांच्या पत्नी व मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी माझ्या महाराष्ट्रात मला धमकी दिली जात आहे, जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्याला मंत्री आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.