पेण येथील अमानुष वासनाअंधाची शिकार झालेल्या चिमुरडीच्या कुटुंबियांची राज्यमंत्री रामदास आठवले घेणार भेट

या प्रकरणात वासनाअंधाची शिकार ठरलेल्या मृत चिमुरडीच्या कुटुंबियांची ना. रामदास आठवले उद्या १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता पेण येथील निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेणार आहेत.

मुंबई. रायगड जिल्ह्यातील पेण मध्ये अवघ्या ३ वर्षांच्या कोवळ्या चिमुरड्या मुलीवर वासना अंधाने बलात्कार करून खून केल्याच्या अमानुष प्रकाराचा तिव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे. या प्रकरणात वासनाअंधाची शिकार ठरलेल्या मृत चिमुरडीच्या कुटुंबियांची ना. रामदास आठवले उद्या १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता पेण येथील निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेणार आहेत.

लहान मुलींवर महिलांवर असे अमानुष बलात्कार करून निर्घृण खून करण्याचे प्रकार रोखले पाहिजेत.या प्रकरणी गुन्हेगारांना ६ महिन्यात खटला चालवुन त्वरित फाशी दिली पाहिजे. असे सांगत ना रामदास आठवले यांनी पेण मधील झालेल्या प्रकाराचा तीव्र धिक्कार केला आहे.