uday samant

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका कारला अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने सुरक्षा ताफ्यातील एक कार उदय सामंत यांच्या कारवर आदळल्याने हा अपघात झाला(Minister Uday Samant's car crashes in Mumbai; One person was injured in a collision between a security unit and a vehicle due to brake failure).

    मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका कारला अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने सुरक्षा ताफ्यातील एक कार उदय सामंत यांच्या कारवर आदळल्याने हा अपघात झाला(Minister Uday Samant’s car crashes in Mumbai; One person was injured in a collision between a security unit and a vehicle due to brake failure).

    मुबई मध्ये कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनाला हा अपघात झाला. रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. स्पेशल सिक्युरिटी युनिटच्या कारचा ब्रेक फेल होऊन ही कार उदय सामंत यांच्या कारवर आदळली. यावेळी सामंत कारमध्ये एकटेच होते.

    दोन वाहनांची ही धडक इतकी जोरदार होती की ब्रेक फेल झालेल्या कार मधील सिक्युरिटी ऑफिसर जखमी झाला आहे. उदय सामंत या अपाघातातून सुखरुप बचावले आहेत.

    जखमी सिक्युरिटी ऑफिसरवर कूपर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. या अधिकाऱ्याच्या औषधोपचाराचा खर्च ना उदय सामंत करणार आहेत.