Ministry of Maharashtra, Mumbai
महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई

मंत्रालयात फिंगरप्रिंट आधारित बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीऐवजी आधार प्रमाणीत चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा वापर करण्यासंदर्भात भरणे यांच्या उपस्थितीत  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विवेक भिमनवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे अवर सचिव लक्ष्मण सावंत आदिसह अधिकारी उपस्थित होते.

    मुंबई : (किशोर आपटे) मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना आता चेहरा दाखवूनच हजेरीची नोंद करावी लागणार आहे! कोविड आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती प्रणालीचा वापर करण्यावर स्थगिती आल्याने  पर्याय म्हणून   चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

    बायोमेट्रिक प्रणालीऐवजी आधार प्रमाणीत चेहरा पडताळणी

    मंत्रालयात फिंगरप्रिंट आधारित बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीऐवजी आधार प्रमाणीत चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा वापर करण्यासंदर्भात भरणे यांच्या उपस्थितीत  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विवेक भिमनवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे अवर सचिव लक्ष्मण सावंत आदिसह अधिकारी उपस्थित होते. सामान्य प्रशासन राज्यमंत्री भरणे म्हणाले, कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रिक पद्धतीने उपस्थितीवर स्थगिती आणण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा वापर केल्यास कर्मचाऱ्यांचा वेळही वाचणार असून, प्रायोगिक तत्वावर अशा काही मशिनचा वापर करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री भरणे यांनी दिले.