मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची नार्को टेस्ट करा, आमदार राम कदम यांची मागणी

आमदार राम कदम(ram kadam tweet)) यांंनी नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट(narco test of chief minister and home minister) करण्याची मागणी केली आहे. ‘दूध का दूध  और पानी का पानी होऊन जाईल’, असे त्यांनी म्हटले आहे.

    मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(parambeer sing) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत केलेला खुलासा आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंची  भूमिका यामुळे महाविकास आघाडी सरकार गोत्यात आले  आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी  भाजपने राज्यभर आंदोलन छेडले आहे. आता आमदार राम कदम यांंनी पोलीस महासंचालक हेमंत नगराळेंची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे.

    राम कदम यांंनी नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. ‘दूध का दूध  और पानी का पानी होऊन जाईल’, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या दोघांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी राम कदम यांनी दिली आहे.

    दुसऱ्या एका ट्विटमध्येे त्यांनी म्हटलं आहे की ,या प्रकरणासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त हेेमंत नगराळे यांनी भेट घेणार आहे. आता देशासमोर आलं आहे की वसुली सरकार वाझेंची वकिली करत आहे.