अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार ; राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसेचा इशारा

अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली असता दिंडोशी कोर्टाकडून (Dindoshi Court)  मनसे अध्यक्ष (Raj Thackeray) राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टाने राज ठाकरे आणि मनसे सचिवांना आगामी वर्षात ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मराठी भाषेवरून (Marathi Language) पुन्हा एकदा मनसे (MNS) आणि अ‍ॅमेझॉन (Amazon) यांच्यात वाद पेटला आहे. अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने सुरु केलेल्या मोहिमने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली असता दिंडोशी कोर्टाकडून (Dindoshi Court)  मनसे अध्यक्ष (Raj Thackeray) राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टाने राज ठाकरे आणि मनसे सचिवांना आगामी वर्षात ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आपण मराठीच्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं मनसेने सांगितलं असून ॲमेझॉनची मस्ती लवकरच उतरवणार, असा इशारा मनसेने दिला आहे.

राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी अ‍ॅमेझॉनला इशारा दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्याने यांची मोठी किंमत ॲमेझॉनला मोजावी लागणार आहे. आम्हीही त्यांना नक्कीच कायदेशीर उत्तर देऊ, असं अखित्र चित्रे यांनी सांगितले. तसेच ॲमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नाही. मग आम्हालाही महाराष्ट्रात ॲमेझॉन मान्य नाही. मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अ‍ॅमेझॉनला महाराष्ट्रात व्यवसाय करु देत आहे हे विसरता कामा नये. अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की आहे. असा इशारा मनसेने दिला आहे. तसेच फ्लिपकार्टने मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध केल्यामुळे अखिल चित्रे यांनी फ्लिपकार्टचे आभार मानले आहेत.

काय आहे नेमका वाद :

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अ‍ॅप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.