
वाझे हे मुख्यमंत्र्यांसाठीच काम करत होते. तेच त्यांचे वाझेंचे गॉडफादर आहेत. हिरेन यांना मारण्याचं पाप वाझेंनीच केलं आहे. वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते. त्यामुळे वाझे हे मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक होते का? असा सवाल करतानाच या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नका घेऊ, फम पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी राणे यांनी केली.
मुंबई: भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिरेन यांना मारण्याचं पाप वाझेंनीच केलं आहे. वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते. त्यामुळे वाझे हे मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक होते का? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
सचिन वाझेंना पोलीस खात्यात आम्ही आणलं नाही, असं अनिल देशमुख आणि परमबीर सिंगही म्हणत आहेत. म्हणजेच वाझेंना पोलीस खात्यात मुख्यमंत्र्यांनी आणल्याचं स्पष्ट होत आहे. सिंग यांचा रोख थेट मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आहे. वाझे हे मुख्यमंत्र्यांसाठीच काम करत होते. तेच त्यांचे वाझेंचे गॉडफादर आहेत. हिरेन यांना मारण्याचं पाप वाझेंनीच केलं आहे. वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते. त्यामुळे वाझे हे मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक होते का? असा सवाल करतानाच या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नका घेऊ, फम पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी राणे यांनी केली.