खासदार संजय राऊत घेणार शरद पवारांची भेट ; दिल्लीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक होणार

पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज संध्याकाळी ५ वाजता ही बैठक होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुद्धा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. ठाकरे सरकार अडचणीत आले असून आता स्वतः शरद पवार हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत.

    पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज संध्याकाळी ५ वाजता ही बैठक होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुद्धा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

    या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी गृहमंत्री बदलण्याविषयी चर्चा होणार आहे. तसेच परमबीर सिंग यांच्या आरोपातील सत्यतेबाबतही चर्चा करण्यात येणार आहे.