sanjay raut

भाजप (BJP) आणि केंद्र सरकार (Central Government) अनेक गंभीर आरोप केले असता, मला धमकी देणारा अद्याप जन्माला आलेला नाहीये आणि जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने (ED) नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप (BJP) आणि केंद्र सरकार (Central Government) अनेक गंभीर आरोप केले असता, मला धमकी देणारा अद्याप जन्माला आलेला नाहीये आणि जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी आपल्याला धमकावले जात असून मी कुणालाही घाबरत नाही. मी या सगळ्यांचा बाप आहे असे म्हटले होते. याविषयी बोलताना, मला धमकी देणारा अद्याप जन्माला आलेला नाही. सरकार पाडण्यासाठी काही करु असं सांगितलं होतं, त्याला मी धमकी मानतो. जो मला धमकी देईल तो राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार होत्या परंतु, त्यांनी ईडीकडे कार्यालयात हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागितला आहे. वेळ वाढवून मागणारे पत्र त्यांनी ईडीला लिहिले असून यात ५ तारखेपर्यंतचा अवधी मागितला आहे.