उद्योजकांसमोरील आव्हानासाठी ‘एमएसएमई’चा पुढाकार; उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण मोहीम राबवणार

  मुंबई : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी एक महत्त्वाची व कामाची बातमी समोर येत आहे. राज्यातील सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांसमोर जी आव्हानं आहेत, किंवा त्यांना ज्या समस्यांना सामोरी जावे लागते, त्यासाठी आता एमएसएमई पुढाकार घेणार असून, या उद्योजकांच्या व्यवसायात अधिक कशी वाढ होईल किंवा त्यांचे अधिक आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठी एक नवीन मोहीम राबवणार आहे. एमएसएमई या संस्थेनं उद्योगाच्या समस्यांसाठी सर्वेक्षणद्वारे मोहीम जाहीर केली आहे. लघु उद्योग भारती या भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सेवा देणाऱ्या संस्थेने मुंबईत “एमएसएमईचे सक्षमीकरण (टू मार्च टूवर्ड वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी)” नावाची नवीन सर्वेक्षण मोहीम जाहीर केली आहे.

  काय आहे मोहिम ?

  दरम्यान, या सर्वेक्षण मोहिमेत 8 प्रमुख विषयांचा समावेश आहे. लघु उद्योग भारती 1 लाखांहून अधिक उद्योजक, सुक्ष्म, लघु आणि मध्यम यातील उद्योजक, कारखानदार, मालक, उत्पादक आदी यांच्याकडून त्यांच्या उद्योगातील नाव, पत्ता, प्रोफाईल, जीएसटी नंबर आहे का? याबाबत सर्वेक्षणाद्वारे डेटा जमवणार आहे. लघु उद्योग भारती व्यवसायांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि उद्योजकांना अधिक चांगला व्यवसाय करता यावा, यासाठी हा सर्वेक्षण 45 दिवसांत करण्यात येणार आहे.

  माहिती कशी भरता येणार ?

  लघु उद्योग भारती व्हॉट्सएप आणि ईमेलद्वारे सर्वेक्षण क्यूआर कोड शेअर करेल. इच्छुक व्यक्ती आणि संस्था कोड स्कॅन करून त्यावर तुमच्या व्यवसायाची माहिती भरु शकता, सर्वेक्षणाशी लिंक करणारे क्यूआर कोड संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एमआयडीसी व बिगर एमआयडीसी दोन्ही ठिकाणी लावण्यात येतील. महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे पॉवरहाऊस आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांचे सर्वात मोठे योगदान आहे. या डिजिटल सर्वेक्षणाद्वारे समस्यांचे तात्काळ निराकरण करणे सोपे जाईल, तसेच या सर्वेक्षणातून व्यवसाय सुलभतेसाठी अधिक महत्वाची भूमिका बजावेल. यामुळे विकासाला गती मिळण्यास मदत होईल. या पोर्टलमुळं उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवल्या जातील. असं लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष, रवींद्र वैद्य म्हणाले.

  काय आहे लघु उद्योग भारती?

  लघु उद्योग भारतीची सदस्यत्व देशभरात पसरलेली आहे. देशभरातील 250 शाखांसह 580 हून अधिक जिल्ह्यांमध्ये त्याचे सदस्यत्व आहे. लघु उद्योग भारती हे एमएसएमई क्षेत्राला संघटित करण्याच्या प्रामाणिक प्रयत्न आहे. या क्षेत्राला ग्रासणाऱ्या विविध समस्या आणि एमएसएमईच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी लघु उद्योग भारती काम करते.