म्युकर मायकोसिसचा वेग मंदावला, ३८८ पैकी मुंबईत ११२ म्युकर मायकोसिसचे रुग्ण

मुंबईत म्युकर मायकोसिस आजाराचे रुग्ण संख्या ५०० च्या वर पोहोचली होती. परंतु योग्य उपचार पद्धतीमुळे म्युकर मायकोसिस आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असल्याचे आरोग्य विभागांकडून सांगण्यात आले. उपचारांनंतर बरे होऊन घरी जाणारयांची संख्या २१९ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ३८८ म्युकर मायकोसिसचे रुग्ण उपचार घेत असून मुंबईबाहेरील रुग्ण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

  मुंबई – मुंबईत म्युकर मायकोसिस रुग्ण संख्या ५०० च्या वर पोहोचली होती. सध्या मुंबईत ३८८ म्युकर मायकोसिसचे रुग्ण असून यापैकी ११२ रुग्ण मुंबईतील आहेत. आतापर्यंत मुंबईत १२४ रुग्णांचा म्युकर मायकोसिस आजारामुळे मृत्यू झाला असून यापैकी फक्त ३७ रुग्ण मुंबईतील असून उर्वरित मुंबई बाहेरीलअसल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. योग्य उपचार पद्धतीमुळे म्युकर मायकोसिस आजाराचा वेग मंदावला आहे.असे यातून दिसून येत आहे.

  मुंबईत म्युकर मायकोसिस आजाराचे रुग्ण संख्या ५०० च्या वर पोहोचली होती. परंतु योग्य उपचार पद्धतीमुळे म्युकर मायकोसिस आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असल्याचे आरोग्य विभागांकडून सांगण्यात आले. उपचारांनंतर बरे होऊन घरी जाणारयांची संख्या २१९ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ३८८ म्युकर मायकोसिसचे रुग्ण उपचार घेत असून मुंबईबाहेरील रुग्ण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

  म्युकर मायकोसिस रुग्ण संख्या :

  सध्या उपचारासाठी दाखल – ३८८
  मुंबईतील रुग्ण – ११२
  मुंबई बाहेरील रुग्ण – २७६
  बरे झालेले रुग्ण – २१९
  मुंबईतील रुग्ण – १६३
  मुंबई बाहेरील रुग्ण – ५६
  एकूण मृत्यू – १२४
  मुंबईतील रुग्णांच्या मृत्यूची संख्या – ३७
  मुंबईबाहेरील मृत रुग्णांची संख्या – ८७