मुकेश अंबानी झाले आजोबा, नीताआजींचा आनंद गगनात मावेना

आकाश आणि श्लोका अंबानी यांनी एका मुलाला जन्म दिला असून अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती जाहीर केलीय. एका निवदेनाद्वारे ही बाब जाहीर करण्यात आलीय. बाळ आणि आईची प्रकृती ठणठणीत असल्याचंही सांगण्यात आलंय.

अंबानी कुटुंबात नव्या पिढीनं जन्म घेतलाय. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आता आजोबा झालेत तर नीता अंबानी या आजी झाल्या आहेत. मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका अंबानी यांना पुत्ररत्न झाल्याची बातमी जाहीर करण्यात आली.

आकाश आणि श्लोका अंबानी यांनी एका मुलाला जन्म दिला असून अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती जाहीर केलीय. एका निवदेनाद्वारे ही बाब जाहीर करण्यात आलीय. बाळ आणि आईची प्रकृती ठणठणीत असल्याचंही सांगण्यात आलंय.

अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलंय की मुकेश आणि नीता अंबानी हे पहिल्यांदाच आजी-आजोबा झाले असून त्याचा त्यांना प्रचंड आनंद झाला आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनानमुळे अंबानी आणि मेहता कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये आकाश आणि श्लोका अंबानी हे विवाहबंधनात अडकले होते. आकाश आणि श्लोका हे शाळेपासूनचे मित्र आहेत. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधूनच दोघांनीही आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलंय. कित्येक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियात सुरु होती. हा लग्नसोहळादेखील जगभर गाजला. राजकारण, चित्रपट, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील एकाहून एक दिग्गज या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.