मुंबई : पालिका रूग्णालयांना १ कोटी ६६ लाख १७ हजारांची अंडी, पाव आणि चहा पावडर

मुंबई महानगर पालिकेतील रूग्णालये आणि प्रसृतीगृहांतील आंतररूग्णांच्या आहारासाठी पालिकेच्यावतीने पाव,अंडी आणि चहा पावडरचे वितरण करण्यात येते. मुंबई शहर पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील रूग्णालयांना अंडी, पाव आणि चहा पावडरचे वितरण करण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीत उध्या बुधवारी १ कोटी ६६ लाख १७ हजार रूपयांचा प्रस्ताव मंजूरीसाठी येणार आहे(Mumbai: 1 crore 66 lakh 17 thousand eggs, bread and tea powder to municipal hospitals).

    मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील रूग्णालये आणि प्रसृतीगृहांतील आंतररूग्णांच्या आहारासाठी पालिकेच्यावतीने पाव,अंडी आणि चहा पावडरचे वितरण करण्यात येते. मुंबई शहर पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील रूग्णालयांना अंडी, पाव आणि चहा पावडरचे वितरण करण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीत उध्या बुधवारी १ कोटी ६६ लाख १७ हजार रूपयांचा प्रस्ताव मंजूरीसाठी येणार आहे(Mumbai: 1 crore 66 lakh 17 thousand eggs, bread and tea powder to municipal hospitals).

    मुंबईतील पालिका रूग्णालयातील रूग्णांना सकस आहार आणि पथ्य आहार मिळावा यासाठी पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात तरतूद केली असून त्यानुसार गरजेनुसार या रूग्णालयांना पुरवठा करण्यात येतो. पालिका रूग्णालयातील रूग्णांना चहा पावडर, अंडी, पाव याचे वितरण करण्यात यावे यासाठी निवीदा मागविण्यात आल्या होत्या.

    वाजवी आणि अल्प दाराच्या निवीदाकारांची शिफारस करण्यात आली असून त्यांनाच हा ठेका देण्यात येणार आहे. उध्या स्थायी समितीत हा १ कोटी ६६ लाख १७ हजार रूपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात येणार असून त्यास सर्व पक्षीय सदस्य पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे. स्थायी समितीत या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास रूग्णालयांना या वस्तंूचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.