निवडणुकीत मतदारांचा कौल मिळावा यासाठी नगरसेवक कामाला लागले आहेत. यापूर्वी रस्ते कामांसाठी १ हजार ८१५ कोटी रुपयांना स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर उध्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या प्रस्तावात ४४३.१६ कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे(Mumbai: Another Rs 443 crore spent on strong roads; Proposal submitted to Standing Committee for approval). या रस्ते कामात आरे कॉलनीतील रस्त्यासह १४३ रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे रस्ते विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

  मुंबई : निवडणुकीत मतदारांचा कौल मिळावा यासाठी नगरसेवक कामाला लागले आहेत. यापूर्वी रस्ते कामांसाठी १ हजार ८१५ कोटी रुपयांना स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर उध्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या प्रस्तावात ४४३.१६ कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे(Mumbai: Another Rs 443 crore spent on strong roads; Proposal submitted to Standing Committee for approval). या रस्ते कामात आरे कॉलनीतील रस्त्यासह १४३ रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे रस्ते विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

  मुंबईतील ६ मीटर पेक्षा लहान तसेच काही मोठ्या रस्त्यांचे सिमेंट कॉक्रिटीकरण आणि डांबरी करण्याचे हे प्रस्ताव आहेत. यावर पालिका ४४३ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. ‍पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिका १८० कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च करणार आहे.तर,दक्षिण मध्य मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ९४ कोटी ९८ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.ही कामे दिड ते अडीजच वर्षात पूर्ण हाेणार आहेत.

  गोरेगावच्या आरे वसाहतीतील पश्‍चिम द्रुतगती मार्गा पासून पवई येथील मोरारजी नगर पर्यंतचे सिमेंट कॉक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यासाठी ३८ कोटी ४७ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. हा ९.८ किलोमिटर लांबीचा रस्ता आहे.

  पदपथांची दुरुस्ती

  ए,डी,ई या तीन प्रभागातील पदपथांच्या दुरुस्तीचा प्रस्तावही स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.कुलाबा,फोर्ट,ग्रन्टरोड,
  वाळकेश्‍वर,भायखळा, या भागातील १९ पदपथांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.त्यावर महानगर पालिका ८ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च करणार आहे.

  पुन्हा २० टक्के कमी दराने निविदा

  महानगर पालिकेने एप्रिल महिन्यात रस्ते दुरुस्तीसाठी मागवलेल्या निवीदांमध्ये कंत्राटदाराने ३० टक्क्यांहून अधिक कमी खर्चात काम करण्याची तयारी दाखवली होती.त्यामुळे ती निवीदा प्रक्रिया रद्द करुन पालिकेने पुन्हा निवीदा मागवल्या.मात्र,आताही १३ ते २० टक्के कमी दराने काम करणार होणार आहे.