७५०० सेवा निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी आता मुंबई काँग्रेसचा पुढाकार

गेल्या चार वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. मात्र, अद्याप पर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिले नसल्याचे कर्मचारी सांगतात.

  मुंबई : एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात. मात्र, जून २०१८ पासून राज्यभरातील तब्बल ७ हजार ५०० निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही रक्कम अद्यापही महामंडळाकडून मिळालेली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे २०० कोटी रुपये देणे थकीत असून अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गेल्या चार वर्षापासून चकरा मारत आहेत.

  दरम्यान, ही रक्कम देण्यासाठी एस टी महामंडळाकडे निधी नाही. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडून एसटीला निधी द्यावा असे पत्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी शनिवारी पाठवले आहे.

  संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाने साडे सात हजार निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. मात्र, अद्याप पर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिले नसल्याचे कर्मचारी सांगतात.

  महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून तत्काळ दिले जातात. मात्र, जून २०१८ पासून राज्यभरातील तब्बल ७ हजार ५०० निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे २०० कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.

  कोरोना आजार उपचारासाठी पैशाची चण-चण

  सेवा निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना पैकी, अंदाजे ७१ कर्मचारी व अधिकारी मृत्यू पावल्याची माहिती समोर आली असून यामध्ये कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे सूत्रांकड़ून सांगण्यात येत आहे.

  निवृत्तीनंतरची सर्व देणी तात्काळ देण्याचे परिपत्रक असताना महामंडळात निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळालेली नसल्याचे कर्मचारी सांगतात. हे अन्यायकारक असून मुळात इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्या मुळे साहजिकच निवृत्तीनंतरची रक्कम सुद्धा कमी मिळते. त्यातही सदर रक्कम थकीत राहिल्याने निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना अर्थिक चणचण भासत आहे.

  यातील काही कर्मचाऱ्याना कोरोना प्रादुर्भाव झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्यांना औषध उपचारासाठी सुद्धा रक्कम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

  उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना पत्र

  आशिया खंडातील सर्वाधिक मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये एसटी महामंडळ गणले जाते. तरीही २०१८ पासून ७हजार ५००कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरक मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्व निवृत्त कामगारांना व अधिकाऱ्यांना निवृत्तीचे थकीत पैसे व्याजासह मिळण्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा अशी मागणी आमदार भाई जगताप यांनी केली आहे.

  Mumbai Congress initiative now for the overdue amount of 7500 retired MSRTC employees and officers