मुंबई:उंच भागातील वस्तीला पाणीपुरवठयासाठी भूमिगत टाक्यांचा प्रयोग; अनियमित पाणीपुरवठ्याचे संकट टळणार

उंच भागातील वस्तील पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने कुर्ल्यातील उद्यानांमध्ये भूमिगत पाणी साठवण टाक्या बनवून पंपिंगच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे(Mumbai: Experiment with underground tanks for water supply to high lying areas; Irregular water supply crisis will be avoided).

    मुंबई : उंच भागातील वस्तील पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने कुर्ल्यातील उद्यानांमध्ये भूमिगत पाणी साठवण टाक्या बनवून पंपिंगच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे(Mumbai: Experiment with underground tanks for water supply to high lying areas; Irregular water supply crisis will be avoided).

    उद्यानात जमिनीखाली या टाक्या असल्यामुळे वरील जागेचा वापरही होणार आहे.टॅँकरने पाणी पुरवठा करायला लागून त्यावर होणारा खर्च देखील यामुळे वाचणार आहे. प्रमुख जलवाहिनीपासून पाणी वाहून नेण्याचा आणि टँकरसाठी होणारा खर्च वाचणार आहे.

    मुंबईच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. स्थायी समितीत याबाबत सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार आवाज उठवत पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्थायी समितीची एक बैठक तहकूबही केली होती. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

    दरम्यान, पालिकेने वॉर्ड स्तरावर अनियमित पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण करून कारणे शोधली. यामध्ये एल वॉर्डमधील उंच भागात कमी दाबामुळे पाणी पोहचत नसल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे कुर्ल्यात उंच भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी उद्यानांमध्ये आरसीसी टाक्या बांधून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

    मुंबईला पाणीपुरवठा करणा‍ऱ्या तलावांमधून सुमारे १५० किमीपेक्षा जास्त लांबून जलवाहिन्यांमधून भांडूप जलाशयात पाणी आणले जाते. या ठिकाणी प्रक्रिया करून शुद्धपाणी थेट मलबार हिल-कुलाब्यापासून दहिसरपर्यंत जलाशय-जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा केला जातो.जलवाहिन्यांमधून वसाहतींना पाणीपुरवठा करताना नैसर्गिक दाबाने पाणीपुरवत असताना उंच भागांना पुरेशा दाबाने पाणी पोहोचले जात नाही. त्यामुळे आता मुख्य जलवाहिनी आणि उंचावरील वस्तीपासून मध्यावर भूमिगत टाक्या तयार करण्यात येणार आहेत.