अनिल देशमुखांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्यास तुर्तास उच्च न्यायालयाचा नकार, ४ ऑक्टोबरला होणार पुढील सुनावणी

ईडीकडून(Ed Summons To Anil Deshmukh) आतापर्यंत अनिल देशमुख यांना पाचवेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र देशमुख ईडीपुढे वेळोवेळी हजर झाले नाहीत. या सर्व प्रकरणाविरोधात त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली असून ईडीने बजावलेले समन्स रद्द करावे, अशी मुख्य मागणी याचिकेतून केली आहे.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सविरोधात दाखल(Ed Summons To Anil Deshmukh) केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबरला ऑनलाईन सुनावणी(Online Hearing Of Anil Deshmukh Case) घेण्याचे निश्‍चित केले आहे. ही सुनावणी न्या. सारंग कोतवाल आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर होण्याची शक्यता आहे.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख राज्याच्या गृहमंत्रीपदावर असताना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सीबीआय आणि ईडीमार्फत या प्रकरणाचा तपास आणि चौकशी सुरू आहे. त्यातच ईडीकडून आतापर्यंत अनिल देशमुख यांना पाचवेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र देशमुख ईडीपुढे वेळोवेळी हजर झाले नाहीत. या सर्व प्रकरणाविरोधात त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली असून ईडीने बजावलेले समन्स रद्द करावे, अशी मुख्य मागणी याचिकेतून केली आहे.

    या याचिकेवर सुरूवातीला एकसदस्य न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर त्यावर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, ईडीच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार असल्याने याचिकेची सुनावणी ऑनलाईन घेण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकीलांनी केली. यावर जोरदार आक्षेप घेत याचिकेवर तातडीने सुनावणीनी घ्यावी, अन्यथा तोपर्यंत कठोर कारवाई पासून दिलासा द्यावा. अशी विनंती देशमुख यांच्यावतीने करण्यात आली. ही विनंती खंडपीठाने फेटाळून लावली.याचिका ऐकून घेतल्याशिवाय कोणताही दिलासा देणार नाही असे स्पष्ट करत खंडपीठाने याचिकेची ऑनलाईन सुनावणी बुधवारी निश्‍चित केली होती.

    त्यानुसार बुधवारी न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने याचिकेची सुनावणी ४ ऑक्टोबरला ऑनलाईन सुनावणी निश्चित केली करताना देशमुख यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. आता या याचिकेवर पुढील सोमवारी न्या. सारंग कोतवाल आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर होण्याची शक्यता आहे.