नवरा नसताना तो तिच्या घरी गेला आणि पुढे घडलं असं की, न्यायालयाने सुनावली शिक्षा

रात्री अकराच्या सुमारास ती झोपली असताना आरोपी पुन्हा तिच्या घरी आला. महिलेने घराचा मुख्य दरवाजा कुंडी न लावता बंद केला होता. तिच्या पायाला कोणीतरी हात लावल्याचे जाणवताच ती जागी झाली आणि आरोपी तिच्या पायाजवळ बसलेला दिसला. पीडितेने मोठ्याने आरडाओरडा केल्याने ती व्यक्ती पळून गेली. पीडितेने पतीला फोनवरून घटनेची माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पती परत आला. त्यांनी आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.

    झोपलेल्या महिलेला हात लावल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

    मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एम.जी.सेवलीकर यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना सांगितले की, या प्रकरणातील आरोपीचे कृत्य महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे. आरोपी पीडितेच्या पायाजवळ खाटेवर बसला होता. यावेळी आरोपीने पीडितेच्या पायाला स्पर्शही केला. या वर्तनावरून आरोपींचा हेतू चुकीचा असल्याचे दिसून येते.

    नेमकं प्रकरण काय?

    हे प्रकरण महाराष्ट्रातील जालन्याचे आहे. पीडितेने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, ती आणि तिची सासू ४ जुलै २०१४ रोजी घरात एकटेच होते. नवरा गावाला गेला होता. रात्री आठच्या सुमारास एक व्यक्ती आली आणि नवऱ्याबद्दल तिला विचारू लागली. बोलण्याच्या ओघात महिलेने त्या व्यक्तीला सांगितले की, पती रात्री परत येणार नाही. त्यानंतर ओरोपी परत गेला.

    रात्री अकराच्या सुमारास ती झोपली असताना आरोपी पुन्हा तिच्या घरी आला. महिलेने घराचा मुख्य दरवाजा कुंडी न लावता बंद केला होता. तिच्या पायाला कोणीतरी हात लावल्याचे जाणवताच ती जागी झाली आणि आरोपी तिच्या पायाजवळ बसलेला दिसला. पीडितेने मोठ्याने आरडाओरडा केल्याने ती व्यक्ती पळून गेली. पीडितेने पतीला फोनवरून घटनेची माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पती परत आला. त्यांनी आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.

    सुनावणीत काय झालं?

    ऑगस्ट २०२१ रोजी, दंडाधिकारी न्यायालयाने कलम ४५१ आणि ३५४ A(i) (शारीरिक संपर्क आणि अवांछित आणि स्पष्ट लैंगिक प्रस्तावासह आगाऊ पावले उचलणे) अंतर्गत दंडनीय गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले होते. त्याविरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

    आज तकच्या वृत्तानुसार, आरोपीचे वकील प्रतीक भोसले यांनी दावा केला की महिलेने दरवाजा आतून बंद केला नाही, हे दर्शविते की पुरुषाने महिलेच्या संमतीने घरात प्रवेश केला होता. एफआयआर नोंदवण्यास सुमारे १२ तासांचा विलंब झाला आणि त्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला. ट्रायल कोर्टाने आरोपींना दोषी ठरवण्यात मोठी चूक केली आहे.

    तर, सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, “स्त्रीच्या शरीराच्या कोणत्याही भागाला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करणे, तेही रात्रीच्या वेळी हे स्त्रीच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन आहे. ही संपूर्ण घटना ऐकल्यावर आरोपी कोणत्याही उदात्त हेतूने पीडितेच्या घरी गेला नसल्याचे दिसून येते. तिने संध्याकाळी पीडितेकडून खात्री करून घेतली होती की तिचा पती रात्री घरात उपस्थित राहणार नाही. यात स्पष्टपणे नमूद केले आहे की अर्जदार लैंगिक हेतूने तिथे गेला होता आणि महिलेचा विनयभंग केला होता. त्यामुळे अर्जदाराने पीडितेचा विनयभंग केला आहे, असे मानण्यात ट्रायल कोर्टाने कोणतीही चूक केलेली नाही.’

    त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.