मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे ‘या’ पदांसाठी भरती, अर्ज कसा करायचा?: जाणून घ्या सविस्तर

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.

  मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.

  पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  या पदांसाठी भरती आहे

  मुख्य अग्निशमन अधिकारी

  अग्निशमन अधिकारी

  मुख्य अग्निशमन अधिकारी – अर्जदाराने राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून अग्नि अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा प्रगत डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

  अग्निशमन अधिकारी – अर्जदाराने राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून अग्नि अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा प्रगत डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

  या ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज
  Chief Fire Officer –  recruitment.cfo@mmmocl.co.in
  Fire Officer –  recruitment.fo@mmmocl.co.in

  निवड प्रक्रिया अशी असेल

  या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड प्रतिनियुक्तीच्या आधारे करण्यात येणार आहे.
  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2021