मुंबई महापालिकेत किमान २५ नगरसेवक निवडून आणणार; रामदास आठवलेंचा निर्धार

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे किमान २५ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे(Mumbai Municipal Corporation will elect at least 25 councilors; The decision of Ramdas Athavale). विक्रोळी येथे ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात आठवले बोलत होते.

    मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे किमान २५ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे(Mumbai Municipal Corporation will elect at least 25 councilors; The decision of Ramdas Athavale). विक्रोळी येथे ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात आठवले बोलत होते.

    ईशान्य मुंबईत १९७२ च्या पालिका निवडणुकीत ७ नगरसेवक रिपाइं चे निवडून आले होते तर संपूर्ण मुंबईत रिपाइं चे १२ नगरसेवक त्याकाळात निवडून आले होते. रिपब्लिकन पक्ष आता केवळ बौद्धांचा आणि एका जातीचा राहिला नसून सर्व जाती धर्मियांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष झाला आहे. संपूर्ण देशात रिपब्लीकन पक्ष पोहोचला आहे.

    झोडपट्टीवासीयांचे गरिबांचे नोकरीचे घराचे प्रश्न रिपब्लिकन पक्ष सोडविण्यात अग्रेसर रिपब्लिकन पक्ष आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय युती होणार असून सत्ता आल्यास पहिली अडीज वर्षे रिपाइं चा उपमहापौर तर भाजप चा महापौर होईल. तसेच नंतरची अडीज वर्षे रिपाइं चा महापौर होईल असे भाजप सोबत ठरले असल्याचे आठवले यांनी जाहीर केले.