मुंबई : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिकेची यंत्रणा सज्ज; ७० हजार बेड्सची तयारी

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली असून यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सध्या ७० हजार बेड्स तयार असून १५ हजार बेड्स अॅक्टीव असून गरजेनुसार वाढवल्या जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली(Mumbai: Municipal system ready on the back of Omaicron; Preparation of 70,000 beds).

    मुंबई : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली असून यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सध्या ७० हजार बेड्स तयार असून १५ हजार बेड्स अॅक्टीव असून गरजेनुसार वाढवल्या जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली(Mumbai: Municipal system ready on the back of Omaicron; Preparation of 70,000 beds).

    कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर काही दिवसांत जगभरात पसरला. घातक असलेला ओमायक्रॉनने महाराष्ट्रातही शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे खबरदारी घेत पालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पालिकेकडून एअरपोर्टवर आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी केली जात आहे. रुग्णालये आणि कोविड सेंटरमधील बेड सज्ज ठेवले असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

    सध्या ७० हजार बेड्स उपलब्ध आहेत. मुंबईत १५ हजार बेड्स ऍक्टिव्ह आहेत. काही कोविड सेंटरही सज्ज ठेवले आहेत. कोविड सेंटर सुरु झाल्यावर बेड्सची संख्या ३० हजार इतकी होईल. तसेच तिसरी लाट येणार असे सांगीतले जात होते. त्यासाठी पालिकेने लहान मुलांसाठी १५०० बेड्स सज्ज ठेवले आहेत. लहान मुलांसाठी मास्क आणि व्हेंटीलेटरही तयार आहेत. यामुळे बेड्सची कोणत्याही प्रकारे कमतरता भासणार नाही असे काकाणी यांनी सांगितले.

    परदेशी प्रवाशांच्या चाचण्या

    ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यात १९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पालिकेचे हेल्थ पोस्ट आणि वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून हे प्रवासी क्वारंटाईनच्या नियमांची अंमलबजावणी करतात की याकडे लक्ष दिले जाते आहे. या प्रवाशांच्या जिनोम सिक्वेंसिंगचा चाचण्या केल्या जात आहेत. त्याचे अहवाल मंगळवारपासून यायला सुरुवात होईल. जे प्रवासी मुंबईत येत आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी काही हॉटेल तसेच पालिकेचे कोविड सेंटर सज्ज ठेवले आहे. ज्यांना पैसे भरून हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हायचे त्यांना तेथे पाठवले जाईल. तसेच पालिकेच्या कोविड सेंटरमध्येही दाखल केले जाईल, असे काकाणी यांनी सांगितले.