
लॉकडाऊन दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी केवळ लोकल सेवा सुरू होती. त्यानंतर जवळपास ११ महिन्यांनी सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू झाली.
दिवसेंदिवस कोरोना वेगाने पसरत आहे. रूग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. यासाठी मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं महत्त्वाच आहे. पण लोकलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं कठीण झालं आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कोरोना आणखी वाढण्याआधीच प्रशासनाद्वारे खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्या बैठका होत आहेत. यातून पुढील आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास लोकल सेवेवर निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लॉकडाऊन दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी केवळ लोकल सेवा सुरू होती. त्यानंतर जवळपास ११ महिन्यांनी सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू झाली. यावेळी कोरोना नियमांचे पालन करावे, सर्वसामान्य प्रवाशांनी गर्दीच्यावेळी प्रवास टाळावा अशा सूचना राज्य सरकारच्यावतीने देण्यात आल्या होत्या. मात्र, फेब्रुवारीचा संपूर्ण महिना कोणत्याही वेळी सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास लोकलमधून होत होता.
मार्च महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने, रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. मुंबईत कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर लोकल प्रवासासंदर्भात बैठकी, चर्चासत्र सुरू आहे. पुढील आठवड्यात लोकल प्रवासासंदर्भात नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील चार-पाच दिवसातील कोरोना रुग्ण संख्याचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.