मुंबईत पोलिसाला तृतियपंथीयांकडून मारहाण, कारण काय? : जाणून घ्या सविस्तर

रस्त्याने चालत जाणाऱ्या एका नागरिकाच्या आणि रिक्षा चालकाच्या भांडणात पडून काही तृतीयपंथी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाशी वाद घालत होते. यावेळी वाहतूक पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी या वादात मध्यस्थी केली. यामुळे या तृतीयपंथीयांनी मिळून वाहतूक पोलिसाला मारहाण केली

    मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात देखील पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत.

    दरम्यान अशातच आता मुंबईत देखील असाच एक प्रकार घडला आहे. तृतियपंथीयांनी मिळून मुंबईतील एका वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

    नेमकं काय घडलं?

    रस्त्याने चालत जाणाऱ्या एका नागरिकाच्या आणि रिक्षा चालकाच्या भांडणात पडून काही तृतीयपंथी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाशी वाद घालत होते. यावेळी वाहतूक पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी या वादात मध्यस्थी केली. यामुळे या तृतीयपंथीयांनी मिळून वाहतूक पोलिसाला मारहाण केली. यातील एका तृतीयपंथीयाने स्वत:ची कपडे काढत पोलिसाची कॉलर खेचली आहे. यावेळी घटनास्थळी इतरही पोलीस दाखल झाले. परंतु तृतीयपंथीयांनी त्यांना देखील अश्लील भाषा वापरत धमकी दिली. गोरेगाव भागातील बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.

    दरम्यान यानंतर तीन तृतियपंथीयांवर कारवाई करत त्यांना गजाआड टाकण्यात आलं आहे. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या लोकांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे.