मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी घेतली राज्यपालांची भेट; चर्चांना उधाण

हेमंत नगराळे यांनी राज्यापालांची भेट घेतली असं राज्यपाल भवनाने ट्विट केले आहे. राज्यपालांनी नगराळेंशी काय चर्चा केली हे समजले नसले तरी, सचिन वाझे प्रकरण, अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लागलेले आरोप आणि परमबीर सिंगांचा सचिन वाझे प्रकरणात असलेला सहभाग अशा ईतर अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

    मुंबई : सचिन वाझे प्रकरणवरुन राज्याचं राजकारण तापतं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे विरोधक महाविकास आघाडी सरकारवर आक्रमक झाले आहेत.

    आज परमबीर सिंग यांनी होमगार्डच्या मुख्यलयात हजेरी लावली आणि महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर काही वेळातचं हेमंत नगराळे यांनी राज्यापालांची भेट घेतली असं राज्यपाल भवनाने ट्विट केले आहे. राज्यपालांनी नगराळेंशी काय चर्चा केली हे समजले नसले तरी, सचिन वाझे प्रकरण, अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लागलेले आरोप आणि परमबीर सिंगांचा सचिन वाझे प्रकरणात असलेला सहभाग अशा ईतर अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

    गृहमत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी राज्यसभेतही मोठा गदारोळ झाला आहे. त्यामुले राज्यसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब केले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.