Mumbai Police's 'Operation All Out' - Combing operation in the city

नववर्षाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी(mumbai police) नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.  दरम्यान भन्नाट ट्विट करण्यासाठी चर्चेत असणाऱ्या मुंबई पोलिसांनी(mumbai police on twitter) ट्विटरवर प्रश्न विचारणाऱ्याला दिलेलं एक उत्तर सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे.

महाराष्ट्र सरकारने रात्रीची संचारबंदी(night curfew in maharashtra) जाहीर केली आहे. या संचारबंदीचे निर्बंध ५ जानेवारीपर्यंत निर्बंध लागू असतील.  नववर्षाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी(mumbai police) नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.  दरम्यान भन्नाट ट्विट करण्यासाठी चर्चेत असणाऱ्या मुंबई पोलिसांनी(mumbai police on twitter) ट्विटरवर प्रश्न विचारणाऱ्याला दिलेलं एक उत्तर सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई पोलिसांनी ‘ऑनलाइन एकत्र या’ असं आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं होतं. यावर दिपक जैन यांनी ट्विट करुन विचारलं की, “जर मी तिच्या घरी ११ वाजता पोहोचलो आणि रात्रभर तिथंच राहिलो तर”. त्याच्यावर मुंबई पोलिसांनीही जबरदस्त उत्तर दिलं आहे.


मुंबई पोलिसांनी दिपक जैन यांच्या ट्विटला उत्तर देत म्हटलं आहे की, “तू तिची परवानगी घेतली असशील अशी आम्हाला आशा आहे, अन्यथा आमच्या डोक्यात तुझ्यासाठी राहण्याची एक पर्यायी व्यवस्था आहे”. यावेळी मुंबई पोलिसांनी #ConsentMatters #SafetyFirstOn31st हे हॅशटॅगदेखील वापरले आहेत.