mumbai police using drone

नव्या वर्षाची सुरुवात जोशात करण्याचे बेत आखले जात आहेत. मात्र कोरोना संकटामुळे यंदाच्या सेलिब्रेशनमध्ये फरक पडणार आहे. मुंबई पोलिसांची गच्चीवरील पार्ट्यांवर नजर(drone watch on party) असणार आहे. तसेच मुंबई पोलिसांनी ११ च्या आत पार्टी संपवा, हे सांगणारे ट्विटही केले आहे.

मुंबई : सध्या सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताच्या(new year celebration) तयारीचा उत्साह दिसून येत आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने थर्टी फस्टच्या पार्टीची(thirty first party) तयारी करत आहे. नव्या वर्षाची सुरुवात जोशात करण्याचे बेत आखले जात आहेत. मात्र कोरोना संकटामुळे यंदाच्या सेलिब्रेशनमध्ये फरक पडणार आहे. मुंबई पोलिसांची गच्चीवरील पार्ट्यांवर नजर(drone watch on party) असणार आहे. तसेच मुंबई पोलिसांनी ११ च्या आत पार्टी संपवा, हे सांगणारे ट्विटही केले आहे.


मुंबई पोलीस ड्रोनद्वारे गच्चीवर होत असलेल्या पार्ट्यांवर नजर ठेवणार असल्याची माहिती मिळाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. मुंबईत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत जमावबंदी असल्याने चारपेक्षा अधिक जणांना एकत्र येऊन सेलिब्रेशन करता येणार नाही.

गच्चीवरच्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे ३५ हजार पोलीस रस्त्यावर तैनात असतील. तसेच ड्रोनद्वारे ते नजर ठेवणार आहेत.