Mumbai Police's 'Operation All Out' - Combing operation in the city

मुंबई : थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत. शहरातील प्रमुख ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम सुरू केली आहे. शहरातील संशयित आरोपींची धरपकड सुरू आहे. शहरात नाईट कर्फ्यू असून हा कर्फ्यू थर्टी फर्स्ट आणि खि्रसमसच्या दिवशीही लागू राहणार आहे.

मुंबई पोलीस आयुक्त आणि पाच संयुक्त पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक बारीक हलचालींवर नजर ठेवत आहेत. नाईट कर्फ्यूमुळे लॉटेल, पब आणि परमिट रूम रात्रभर सुरू ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने शहरावर नजर ठेवली जाणार आहे.

मुंबई पोलिसांकडून थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी बुधवारी रात्रीपासून ‘ ऑपरेशन ऑल आऊट’ शहरातील विविध परिसरामध्ये राबवण्यात आले. यादरम्यान १,४४८ प्रकरणांचा तपास करून २३८ वॉन्टेड आरोपींना आणि ९ ड्रग्जचे सेवन करणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान १० तडीपार आरोपींनाही अटक केली. पोलिसांच्या धरपकडीत १ कट्टा आण्िा १ रिव्हॉल्वरसह १४ अवैध शस्त्र जप्त करण्यात आले.

मुंबई पोलिसांनी शहरातील प्रमुरख रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. बुधवारी १२ ठिकाणांवर नाकाबंदी करून ७४२३ वाहनांची झाडाझडती घेतली. तर ७१५ हॉटेल, लॉजवर धाड मारली. शहरातील ४३९ संशयित ठिकाणांवर गस्त वाढवली आहे. संशयित आणि आरोपींना अटक करण्यासाठी ‘ऑपरेशन ऑला ऑऊट’ राबवण्यात आले. कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.

पाचहून जास्त नागरिकांना रात्री फिरण्यास मज्जाव आहे. रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. हा कर्फ्यू ५ जानेवारीपर्यंत लागू आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्कचा वापर करूनच घराबाहेर पडण्यास परवागनी आहे.

- विश्वास नांगरे पाटील, संयुक्त पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस