मुंबई : 48 कोटी खर्चूनही रस्त्यांची चाळण; भाजपाची टीका

मुंबईतील रस्त्यांवर 42 हजार खड्डे पडल्याचा दावा पालिकेने केला होता. सध्या मुंबईतील रस्त्यात 927 खड्डे असल्याचे पालिकेच्या पोर्टलवर असल्याचे दिसत आहेत. असे असताना महापौर किशोरी पेडणेकर यांची धावाधाव सुरू असल्याची टीका शेलार यांनी ट्वीटरद्वारे करीत महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष केले आहे.

    मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर 48 कोटी रुपये खर्चूनही रस्त्यांची चाळण झाल्याची टीका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनावर केली आहे.

    मुंबईतील रस्त्यांवर 42 हजार खड्डे पडल्याचा दावा पालिकेने केला होता. सध्या मुंबईतील रस्त्यात 927 खड्डे असल्याचे पालिकेच्या पोर्टलवर असल्याचे दिसत आहेत. असे असताना महापौर किशोरी पेडणेकर यांची धावाधाव सुरू असल्याची टीका शेलार यांनी ट्वीटरद्वारे करीत महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष केले आहे.

    मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. खड्ड्यांचा त्रास मुंबईकरांना होऊ लागला असून प्रशासन आणि पालिकेतील सत्ताधारी हतबल झाल्याची टीका शेलार यांनी केली आहे. कंत्राटदारांवर कारवाई करा म्हणायचे आणि मागच्या दाराने कमिशन खायचे असा आरोपही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.