महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी?

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

सुबोध जैस्वाल यांच्या बदलीनंतर महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. या पदासाठी चार वरिष्ठ IPS अधिकारी मैदानात आहेत. संजय पांडे, हेमंत नगराळे, सुरेंद्र कुमार पांडे आणि रजनीश सेठ यांची नावं चर्चेत आहेत. परंतु नगराळे यांचे पारडे जड मानले जाते.

कोण आहेत हेमंत नगराळे?
हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जैस्वाल यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार आधी संजय पांडे यांचा क्रमांक लागतो. परंतु पांडे जून२०२१ मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार दुसऱ्या स्थानी असलेल्या हेमंत नगराळेंची वर्णी निश्चित मानली जाते.हेमंत नगराळे यांचा १९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.

महासंचालकपदाच्या शर्यतीत कोण कोण?
1) संजय पांडे, पोलीस महासंचालक, होमगार्ड
2) हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक, विधी आणि तंत्रज्ञान
3) सुरेंद्र कुमार पांडे, पोलीस महासंचालक, तुरुंग विभाग
4) रजनीश सेठ, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग