परीक्षासंदर्भात मुंबई विद्यापीठाची मार्गदर्शक तत्वे लवकरच

मुंबई :विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांचे नियोजन करण्यासाठी व अहवालातील तरतूदी विषद

मुंबई :विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांचे नियोजन करण्यासाठी व अहवालातील तरतूदी विषद करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांतील प्राचार्य, संचालक आणि विद्यापीठ शैक्षणिक विभागप्रमुखांशी संवाद साधला. 

कॉलेजांनी घ्यावयाच्या परीक्षा, गुणांचे नियोजन, अंतर्गत मुल्यांकन, ग्रेडींग पॅटर्न, एटीकेटी अशा अनुषंगिक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.पहिल्या टप्प्यात कला, विज्ञान, वाणिज्य कॉलेजांचे प्राचार्य, व्यवस्थापन संस्थांचे संचालक अशा ४७६ तर दुसऱ्या टप्प्यात अभियांत्रिकी, फार्मसी, विधी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य-संचालक अशा ३२६ आणि शेवटच्या टप्प्यात विद्यापीठ विभागातील ५५ विभागप्रमुख/ संचालक अशा एकूण ८५७ प्राचार्य, संचालक आणि विभागप्रमुखांशी आभासी पद्धतीने संवाद साधण्यात आला. विविध तीन टप्प्यांत आयोजित केलेल्या या सत्रांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी अहवालातील तरतूदीनुसार करायवयाची कार्ये विशद करून महाविद्यालयांच्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरावर हेल्पलाईन आणि इमेलची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून जिल्हा पातळीवर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सोय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांच्या नियोजनासाठी विद्यापीठ कृती आराखडा तयार करत असून महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागांसाठी लवकरच मार्गदर्शक तत्वे जाहिर केली जाणार असल्याचेही कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.