मुंबई: वरळी गॅस सिलेंडर स्फोट दुर्घटना; चार महिन्याच्या बाळानंतर त्याच्या वडीलांचाही मृत्यू

वरळी बीडीडी चाळ येथे मंगळवारी, ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या सिलेंडर स्फोटात एकाच घरातील चार जण जखमी होऊन त्यात एका लहान बाळाचा मृत्यू झाला. शनिवारी या बालाच्या वडीलांचाही नायर रुग्णालयात मृत्यू झाला आहे(Mumbai: Worli gas cylinder explosion accident; His father also died after a four-month-old baby).

  मुंबई : वरळी बीडीडी चाळ येथे मंगळवारी, ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या सिलेंडर स्फोटात एकाच घरातील चार जण जखमी होऊन त्यात एका लहान बाळाचा मृत्यू झाला. शनिवारी या बालाच्या वडीलांचाही नायर रुग्णालयात मृत्यू झाला आहे(Mumbai: Worli gas cylinder explosion accident; His father also died after a four-month-old baby).

  या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा झाल्याचे समोर आल्याने चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. याचे पडसाद पालिकेच्या स्थायी समिती आणि सभागृहात उमटले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरली आहे.

  वरळी बीडीडी चाळीत मंगळवारी, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटूंबातील आनंद पुरी (२७) मंगेश पुरी (४) महिने, विद्या पुरी (२५), विष्णू पुरी (५) असे चार जण जखमी झाले. या जखमींना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

  मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यात हलगर्जीपणा करण्यात आला. हा प्रकार समोर येताच मंगेश पुरी (४) विद्या पुरी (२५), विष्णू पुरी (५), यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच रात्री मंगेश पुरी या चार महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. आनंद पुरी हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर नायर रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी ९.४५ च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

  २ डॉक्टर व १ नर्स निलंबित

  नायर रुग्णालयात पुरी कुटूंबावर उपचार करताना हलगर्जीपणा केल्याचे समोर आल्याने उप अधिष्ठाता यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. २ डॉक्टर व १ नर्स यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच मेडिकल विभागाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली तीन डॉक्टरांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. डॉक्टराच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ स्थायी समितीची बैठक तहकुब करण्यात आली. तसेच पालिकेच्या आरोग्य समितीच्या भाजपच्या ११ सदस्यांनी राजीनामा दिला आहे.