मुंबईकरांना डेंग्यू, मलेरियाचा धोका! ९१ लाख ८१ हजार ठिकाणांची तपासणी, घरांमध्येच सापडले डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचे अड्डे

महानगर पालिकेच्या कीटक नाशक विभागामार्फत वर्षभर डास विरोधात मोहीम सुरु असते.यात घरा घरात डासांची पैदास होऊ शकेल,अशी ठिकाणे शोधण्या बरोबरच घरांच्या परीसरातही डासांची पैदास शोधण्यात येते.डेंग्यूच्या डासांचे अड्डे शोधण्यासाठी महापालिकेच्या पथकाने ९१ लाख ८१ हजार ५८८ ठिकाणांची पाहाणी केली. त्यातील ४९ हजार ६०५ ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळली,अशी माहिती किटक नाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

    मुंबई : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आलेला असताना मुंबईत डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढत आहे. मात्र डेंगी पसरवणारा एडिस डास घरातच सापडत आहे. जानेवारी ते आतापर्यंत महानगर पालिकेच्या पथकाने ९१ लाख ८१ हजार ठिकाणची तपासणी केली. त्यापैकी ४९ हजार ६०५ ठिकाणी एडिस आणि ९ हजार २७९ मलेरीया पसरवणारे एनोफिलीस डासांचे अड्डे सापडले आहेत.

    महानगर पालिकेच्या कीटक नाशक विभागामार्फत वर्षभर डास विरोधात मोहीम सुरु असते.यात घरा घरात डासांची पैदास होऊ शकेल,अशी ठिकाणे शोधण्या बरोबरच घरांच्या परीसरातही डासांची पैदास शोधण्यात येते.डेंग्यूच्या डासांचे अड्डे शोधण्यासाठी महापालिकेच्या पथकाने ९१ लाख ८१ हजार ५८८ ठिकाणांची पाहाणी केली. त्यातील ४९ हजार ६०५ ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळली,अशी माहिती किटक नाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

    तर घराबाहेरील २ लाख ५९ हजार ६६९ ठिकाणची तपासणी केल्यावर ९ हजार २७९ ठिकाणी मलेरिया पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती आढळली,असेही ते म्हणाले. नारळाची करवंटी,प्लास्टीकचा पेला याच बरोबर चमचा भर पाण्यातही डेंग्यू आणि मलेरीयाचा डास जन्माला येऊ शकतात. त्यामुळे घराच्या परीसरात तसेच घरात हे डास पोहोचले जातात.पालिकेच्या पथकाने १ जानेवारी पासून ६ सप्टेंबरपर्यंत घरांच्या छपरावरु तसेच आवारातून ३ लाख २५ हजार ४२९ ऑड आर्टिकल म्हणजे डासांची पैदास होऊ शकतील, अशा वस्तू हटवल्या आहेत.त्याच बरोबर १३ हजर ५१५ टायर्स हटविण्यात आले.