Mumbai's endless beach can be seen from the 'Viewing Gallery' on Dadar Chowpatty

मुंबईतील चौपाट्यांवर पर्यटकांची कायम वर्दळ असते. दादर चौपाटी हे मुंबईकरांचे आकर्षण आहे. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर चौपाटीवर ‘व्ह्युविंग गॅलरी’ उभारल्यास समुद्राच्या भरती-आहोटी तसेच वरळीपासून वांद्रेपर्यंतचा समुद्रकिनारा पाहता येणार आहे. त्यामुळे मुंबईकर पर्यटकांना पर्वणी ठरणार आहे.

मुंबई : मुंबईकरांचे आकर्षण असलेल्या दादर चौपाटीवर ‘व्ह्युविंग गॅलरी’ उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या गॅलरीतून मुंबईकरांना समुद्राच्या भरती-आहोटी तसेच वरळीपासून वांद्रेपर्यंतचा समुद्रकिनारा पाहता येणार आहे. यासाठी आवश्यक लागणा-या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. २०२१ पर्यंत ही गॅलरी मुंबईकरांसाठी खुली होणार आहे.

मुंबईतील चौपाट्यांवर पर्यटकांची कायम वर्दळ असते. दादर चौपाटी हे मुंबईकरांचे आकर्षण आहे. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर चौपाटीवर ‘व्ह्युविंग गॅलरी’ उभारल्यास समुद्राच्या भरती-आहोटी तसेच वरळीपासून वांद्रेपर्यंतचा समुद्रकिनारा पाहता येणार आहे. त्यामुळे मुंबईकर पर्यटकांना पर्वणी ठरणार आहे.

ही गॅलरी पूर्वी असलेल्या कापड गिरण्यांमधील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे एक आऊटफॉल जिथे समुद्राला मिळते, त्या ठिकाणी बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गिरण्या बंद असल्यामुळे हा आऊटफॉल वापरात नाही. तुटलेल्या अवस्थेत हा  आऊटफॉल असला तरी दादर चौपाटीवर येणारे लोक येथे बसतात. त्यामुळे येथील चैत्यभूमीच्या मागील बाजूस समुद्रकिनाऱ्यावर ही गॅलरी उभारली जाणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यासाठी आवश्यक परवानग्या व इतर प्रक्रिया लांबणीवर पडली होते. मात्र नुकतीच यासाठी आवश्यक परवानगी महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्याने गॅलरी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाच्या कामाच्या निविदा मागवण्यात आल्या असून तीन कोटी ६१ लाख रुपये खर्च केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.