मुंबईची वेस्टर्न लाईन खड्यात; रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काही कळेच ना?

दहा दिवसांच्या गणरायाच्या मूर्तींचे उध्या विसर्जन आहे. आगमनापुर्वी रस्त्यात पडलेली खड्डे पालिका भरत असते. मात्र यावेळी पालिका प्रशासनाला त्याचा विसर पडला आहे. स्टेशन ते दामुनगर पर्यंत आकुरली मार्गाची दुर्दशा झाली आहे. पालिकेकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी पेवरब्लॉकने खड्डे भरल्याचे दिसून आले. नागरिक आणि वाहन चालक यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ठीक ठिकाणी पाणी साचले असल्याने त्यातून रिक्षा,दुचाकी जाताना नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसापासून पाऊस पडत असल्याने मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कांदिवली पूर्वेच्या आकूर्ली मार्गाची देखील अवस्था बिकट असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.अनेक ठिकाणी डबकी साचली असून त्यातून लोकांना वाट काढत जावे लागत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

    दहा दिवसांच्या गणरायाच्या मूर्तींचे उध्या विसर्जन आहे. आगमनापुर्वी रस्त्यात पडलेली खड्डे पालिका भरत असते. मात्र यावेळी पालिका प्रशासनाला त्याचा विसर पडला आहे. स्टेशन ते दामुनगर पर्यंत आकुरली मार्गाची दुर्दशा झाली आहे. पालिकेकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी पेवरब्लॉकने खड्डे भरल्याचे दिसून आले. नागरिक आणि वाहन चालक यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ठीक ठिकाणी पाणी साचले असल्याने त्यातून रिक्षा,दुचाकी जाताना नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

    घाण पाणी अंगावर उडाल्याने नागरिकात खटके उडाले आहेत. पालिकेने आकूरली मार्गावरील खड्डे भरून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी जोर धरत आहे.महिंद्रा अँड महिंद्रा येलो गेट जवळील रस्त्यावर पाणी का साचते याचा शोध घेवून तेथील गळती रोखावी अशी मागणी या विभागातील नागरिकांनी केली आहे.