गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत परतणाऱ्यांवर पालिकेची करडी नजर; कोरोना चाचण्यांसाठी विशेष मोहिम राबविणार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवास करून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांवर पािलका प्रशासनाने करडी नजर ठेवली असून गाव अथवा अन्य ठिकाणी प्रवास करुन मुंबईत दाखल झालेल्या मुंबईकरांवर काेराेना चाचणीची विशेष माेहिम राबविण्यात येणार आहे. त्याप्रमाणे रुग्ण निदान, अतिजोखमीच्या गटातील व्यक्ती, रुग्णांच्या संपर्कातील सहवासित यांचा शोध घेण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पालिकेने घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

    मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवास करून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांवर पािलका प्रशासनाने करडी नजर ठेवली असून गाव अथवा अन्य ठिकाणी प्रवास करुन मुंबईत दाखल झालेल्या मुंबईकरांवर काेराेना चाचणीची विशेष माेहिम राबविण्यात येणार आहे. त्याप्रमाणे रुग्ण निदान, अतिजोखमीच्या गटातील व्यक्ती, रुग्णांच्या संपर्कातील सहवासित यांचा शोध घेण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पालिकेने घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

    राज्याच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दराच्या तुलनेत काही जिल्ह्यांमध्ये हा दर अधिक दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर चाचण्यांची गती वाढविण्यात येणार असल्याचे  आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. १४ सप्टेंबरपर्यंत राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर २.६ टक्के तर मुंबईत हा दर १.३ टक्के टक्के असल्याचे दिसून आले आहे. पुण्यात हा दर ३.८ टक्के, अहमदनगर ५.५ टक्के, सांगलीत ३.८ टक्के, नाशिकमध्ये ३.७ टक्के, साताऱ्यात ३.५ टक्के, उस्मानाबाद मध्ये ३.२ टक्के, सिंधुदुर्गमध्ये ३ टक्के दर असल्याचे दिसून आले आहे. कोरोना संसर्ग वाढीच्या दृष्टीने पॉझिटिव्हिटी दराचे हे प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

    काही विभागांत विशेष चाचणी केंद्र उभारण्यात आले आहेत. गणेशोत्सव आणि निर्बंध शिथिल त्यामुळे राज्याच्या मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या वाढण्याचा धाेका कायम आहे. यािशवाय प्रवासाचा इितहास असल्यास लक्षणांची वाट न पाहता चाचणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

    मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या काळात प्रवास केला आहे. त्यामुळे अशा स्थितीत संसर्ग वाढण्याचा धोका कायम असल्याने लवकर निदान होण्यासाठी पालिकेच्या घरोघरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासाचा इतिहास असणाऱ्या चाकरमान्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका