कांदिवलीतील चौकाच्या विद्रुपीकरणाकडे पालिकेचा कानाडोळा

कांदिवली पश्चिमेला नव्याने लिंक रोडची निमिर्ती झाल्यानंतर मधोमध असलेल्या चौक तीन  भागात विभागला गेला. एक भाग कांदिवली तर दोन भाग बोरिवली विभागात गेले. स्थानिक नगरसेवकांने लव्ह कांदिवली असा आकर्षित नाम फलक लावून चौकाचे सुशोभीकरण केले. स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. मात्र गेले काही महिने काही जणांनी चौकात बस्तान मांडले आहे. त्यांचा दैनंदिन व्यवहार याच चौकात होतो.

    मुंबई – कांदिवली पश्चिमेला असलेल्या बाळासाहेब देवरस चौकात काहींनी बस्तान मांडल्याने या चौकाची अवस्था दयनीय झाली आहे. स्थानिक नगरसेवकांने वर्ष भरापूर्वीच चौकाचे सुशोभीकरण करून नवी लकाकी आणली होती. मात्र त्याची अवस्था आता दयनीय झाली आहे. याकडे पोलीस आणि महानगर पालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिक, प्रवाशांसह वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

    कांदिवली पश्चिमेला नव्याने लिंक रोडची निमिर्ती झाल्यानंतर मधोमध असलेल्या चौक तीन  भागात विभागला गेला. एक भाग कांदिवली तर दोन भाग बोरिवली विभागात गेले. स्थानिक नगरसेवकांने लव्ह कांदिवली असा आकर्षित नाम फलक लावून चौकाचे सुशोभीकरण केले. स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. मात्र गेले काही महिने काही जणांनी चौकात बस्तान मांडले आहे. त्यांचा दैनंदिन व्यवहार याच चौकात होतो.

    यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. स्थानिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या, त्यांना हाकलून दिले. मात्र त्यांनी पुन्हा याच ठिकाणी  बस्तान मांडले. पालिकेला यासंदर्भात तक्रार केली तर ते त्याकडें दुर्लक्ष करत असून आम्ही माणसांवर कारवाई करत नाही असे उत्तर संबधितांना मिळत असल्याने त्यांनी संताप व्यकत केला आहे.